मुंबई : देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होताना पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
याबाबत बोलताना डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख मायकल रेयान म्हणतात, ‘कोरोनापेक्षा जास्त धोकादायक महामारी येऊ शकते. त्या संकटाचा सामना करण्याची तयारी जगानं करायला हवी,’ असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकच मास्क धुवून वापरणे धोक्याचे
याचबरोबर कोरोनापासून बचाव होण्यासाठी सध्या अनेक नागरिक रियुजेबल मास्कचा वापर करत आहेत. कापडापासून तयार केलेले रेयुजेबल मास्क परवणारा आहे.
याचबरोबर हे मास्क पर्यावरणासाठीसुद्धा अनूकुल आहे. एकच मास्क धुवून वापरणं आरोग्यास योग्य आहे का? याबाबत संशोधन करण्यात आले आहे.
याबाबत संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्जिकल मास्कचा पुन्हा वापर करणे कोरोनापासून बचाव न होण्याचे मोठं कारण असल्याचे समोर आले आहे.
संशोधनातून आलेल्या माहितीनुसार सर्जिकल मास्क तयार करण्यासाठी एब्जॉर्बल लेअर तयार केला जातो. यामुळे एकदा वापरल्यानंतर पुन्हा तोच मास्क पुन्हा वापरल्यास सुरक्षा देऊ शकत नाही.
सर्जिकल मास्क निवडण्यापूर्वी तयार केलेल्या फॅब्रिकची तपासणी केली पाहिजे. दीर्घकालीन वापरादरम्यान त्याचे फॅब्रिक वारंवार धुतल्याने गुणवत्ता कमी होते.
वारंवार वापरल्या जाणार्या स्वस्त गुणवत्तेच्या मास्कचा नैसर्गिकरित्या प्रभाव कमी होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.