लातूर : राज्यावर कोरोनाचे (Corona Virus) संकट पुन्हा एकदा दार ठोठावत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक म्हणजे, लातूर (Latur) शहरात एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे.
वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लातूर महापालिकेने ४२० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना १२ नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण का वाढले?
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कोरोनाची प्रकरणं ज्या भागामधून आली ते सर्व भाग एकमेकांशी संबंधित आहेत. अमरावती हा ग्रामीण भाग आहे.
ज्याठिकाणी कॉन्टॅक्स ट्रेसिंगचे प्रमाण खूप कमी आहे. हेच प्रमुख कारण आहे की हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.
याठिकाणी स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अशीच परिस्थिती आहे.