चिंताजनक परिस्थिती : डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 8 राज्यांत 50 टक्के रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

992
Worrying situation: 50 percent of patients in 8 states of Delta Plus variant; Most patients in Maharashtra

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सर्वांची चिंता वाढविणाऱ्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट बी B.1.617.2 ने हाहाकार उडविला होता.

तथापि कोरोना व्हायरस सतत म्युटेशन करीत आहे आणि अशा म्युटेशनमुळे तयार झालेला डेल्टा व्हेरिएंट आता डेल्टा प्लस व्हेरिएंट मध्ये बदलला आहे.

हा व्हेरिएंट अतिशय धोकादायक मानला जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये लसीद्वारे निर्मित होणाऱ्या अँटीबॉडीज आणि नैसर्गिकरित्या तयार होणारी प्रतिकारशक्ती दोन्ही नष्ट करण्याची क्षमता आहे.

देशातील जवळपास 50 टक्के डेल्टा रूग्ण आठ राज्यात आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महासाथ नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजितकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आतापर्यंत देशातील 21,109 नमुने गंभीर स्वरुपाचे (Concern) असल्याचे आढळले आहेत.

त्यात अल्फा व्हेरिएंट 3969 नमुन्यांत बीटा व्हेरिएंट 149 नमुन्यांत, गॅमा व्हेरिएंट एका नमुन्यात, तर डेल्टा आणि कप्पा व्हेरिएंट 16238 नमुन्यांत सापडल्याचे त्यांनी सांगितले.

डेल्टा प्रकार 35 राज्यांमधील 174 जिल्ह्यात आढळला आहे. नुकत्याच आढळलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आतापर्यंत 12 राज्यात आढळले आहेत. या 12 राज्यांमधील 49 नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडले. सरकारने अलीकडेच हा प्रकार धोकादायक म्हणून घोषित केला होता.

फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अल्फा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले. मे-जूनमध्ये मात्र 90 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टाचे प्रकार दिसून आले.

देशात आतापर्यंत 120 म्युटेशन्स झाले असून त्यापैकी 8 म्युटेशन्स प्राणघातक आहेत. हे 8 प्रकार बहुतेक भारतीय कोरोना रुग्णांमध्ये आढळतात.

डिसेंबर 2020 मध्ये, डेल्टा व्हेरिएंटचा एक रुग्ण केवळ महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात आढळला. मार्च 2021 पर्यंत, तो देशातील 54 जिल्ह्यात पोहोचला आहे, परंतु आता तो 174 जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तामिळनाडूमध्ये नऊ, मध्य प्रदेशात सात, पंजाबमधील दोन, गुजरातमधील दोन, केरळमधील तीन आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक नोंद झाली आहे.

डेल्टा प्लसच्या धसक्यामुळे महाराष्ट्रात नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. केवळ आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे निर्बंध हळूहळू शिथिल किंवा कडक केले जातील. डेल्टा प्लस रूग्ण जास्ती आढळल्यास प्रतिबंध अधिक कडक केले जाऊ शकते, असे सरकार तर्फे सांगितले गेले आहे.

हे देखील वाचा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here