पैलवान सागर धनखड हत्याकांड | ऑलिम्पिक विजेता सुशिलकुमारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

380
Wrestler Sagar Dhankhad Massacre | Olympic champion Sushilkumar handcuffed by police

जागतिक कुस्ती दिनादिवशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आलेच्या सुशिल कुमारच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पैलवान सागर धनखड हत्याकांड प्रकरणात फरार सुशिल कुमार फरारी होता. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

ऑलिम्पिक विजेता ठरलेला सुशिल कुमार हत्याकांडच्या प्रकरणात मुख्य आरोपी कसा झाला? त्याने सागरची हत्या का केली? हे सर्व प्रकरण नेमके काय आहे? जाणून घ्या!

हत्याकांडचे मूळ कारण काय?

सागर धनखड ज्या फ्लॅटमध्ये राहत होता, तो फ्लॅट सुशिल कुमारच्या पत्नीच्या नावावर आहे. ब्रोकरच्या माध्यमातून सागरने हा फ्लॅट भाड्याने राहण्यासाठी घेतला होता.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फ्लॅटच्या भाड्यावरून ही हत्या करण्यात आली आहे. सागर धनखड हा ज्युनिअर नॅशनल पैलवान आहे. त्या फ्लॅटमध्ये सागर शिवाय इतरही सहकारी राहत होते.

काला झटेडी गॅंग लपत होती !

दरम्यान, सुशिल कुमारला कळले की, त्याच्या फ्लॅटवर फरार असणारा कुख्यात गुंड काला झटेडी आणि त्याची गॅंग लपण्यासाठी येत आहे.

सुशिल कुमारने ब्रोकरच्या माध्यमातून सागर धनखडला फ्लॅट रिकामा करण्यासाठी सांगितले. सुरुवातीला सागरने फ्लॅट सोडण्यासाठी टाळाटाळ केली.

परंतु त्यानंतर त्याने फ्लॅट रिकामा केला. पण, एक महिन्याचे भाडे न देताच तो आपल्यासोबत फ्लॅट रिकामा करून गेला. याच रागातून हा गुन्हा घडल्याचा आरोप केला जात आहे.

सागर धनखड आणि त्याचे मित्र बेपत्ता

सुशिल कुमारेन ब्रोकरच्या माध्यमातून दोन महिन्याचे भाडे मागितले. पण, तो टाळाटाळ करत होता. शेवटी सुशिल कुमार आपल्या सहकाऱ्यांची मदत घेऊन सागर आणि त्याच्या ३ मित्रांचे अपहरण केले.

त्या सर्वांना छत्रसाल स्टेडियमध्ये आणण्यात आले आणि सर्वांना बेदम मारहाण केली. मार खाणाऱ्यामध्ये सागरचा दोस्त सोनू महालदेखील होता.

काला झटेडीच्या गॅंगमधील एक गुर्गा होता. त्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. या मारहाणीत सागरच्या डोक्याला गंभीर मार लागला. यानंतर शेवटी सागरने रुग्णालयात प्राण सोडला.

काला झटेडीची सुशिल कुमारला धमकी

पोलिस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचली त्यावेळी सुशिल कुमार आणि त्याचे साथिदार पसार झाले होते. पण, सुशिलचा एक सहकारी पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुशिल कुमारने काला झटेडीसोबत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केला. पण, काला झटेडीने त्याला धमकी दिली.

त्यानंतर पोलिस आणि काला झटेडीपासून वाचण्यासाठी सुशिल कुमार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली आदी ठिकाणांमध्ये इतडून-तिकडे लपण्यासाठी धावू लागला. पण, सुशिल कुमारच्या मागावर असणाऱ्या पोलिसांनी शेवटी त्याला अटक केली.

सुशिल कुमारचा फरार होण्याचा घटनाक्रम

  • ४ मे रोजी पैलवान सागर धनखडची हत्या केली
  • ६ मे रोजी हरिद्वार-हृषिकेशमध्ये एका बाबाच्या आश्रमामध्ये थांबला
  • ७ मे रोजी दिल्लीमध्ये गेला
  • नंतर हरियाणाच्या बहादूरगढमध्ये गेला
  • चंदीगढमधून पंजाबमधील भटिंडाला गेला
  • परत भटिंडामधून चंदीगढमध्ये गेला
  • चंदीगढमधून गुरुग्रामला गेला
  • गुरुग्राममधून वेस्ट दिल्लीत आला
  • त्यानंतर आज मुंडकामध्ये त्याला अटक करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here