कर्नाटकमध्ये पाडव्यानंतर नवीन मुख्यमंत्री दिसेल असा दावा भाजपचे आमदार बासनगौडा पाटील यतनाल यांनी केले आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पांविरोधात यतनाल यांनी बंडखोरी करत दंड थोपटले आहेत. कर्नाटकमधील विजापूरचे भाजपचे आमदार बासनगौडा पाटील यतनाल यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विरोधात सातत्याने टीका केली आहे.
आमदार यतनाल म्हणाले की “मला हात पसरून मंत्रिपद मागण्याची गरज नाही. आमचा मुख्यमंत्री जेव्हा खुर्चीवर बसेल तेव्हा मला आपोआप मंत्रिपद मिळेल.” तसेच कर्नाटकच्या उत्तर भागातून मुख्यमंत्री होईल असा दावा करत थोडी वाट पहा असेही यतनाल म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आमदार यतनाल मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. ऑक्टोबरपासूनन त्यांनी मुख्यमंत्री हटाव मोहीम हाती घेतली होती.
यापूर्वी सत्ताधारी पक्षाती 15 आमदारांनी बंडखोरी केली होती. पूर्वीच्याच मंत्र्यांना मंत्रिपद दिल्याने आमदार नाराज होते.