‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या खासगी जीवनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रसिकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर एका तरुणासोबत फोटो पोस्ट केले.
-
रसिका या व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच तिने याविषयी खुलासा केला आहे.
4 / 9‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली, “होय, मी आदित्य बिलागीला डेट करतेय. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. मी खूप आनंदी आहे.”
‘दो हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं होतं.
-
कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस, असं म्हणत रसिकाने आदित्यसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.
दोन वर्षांपूर्वी रसिकाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती.
8 / 9तेथेच तिची आदित्यशी ओळख झाली असून या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे.
(सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, रसिका सुनील)