तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा? धनंजय मुंडे ‘मित्राच्या’ आठवणीने व्याकूळ!

496

तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा? धनंजय मुंडे ‘मित्राच्या’ आठवणीने व्याकूळ!

धनंजय मुंडे ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याचदा व्यक्तही होत असतात. काल मित्राच्या जाण्याने ‘हळवा’ झालेल्या मित्राला पहायला मिळाले.

मुंबईः राज्याचे मंत्री काही दिवसांपासून रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे वादात सापडले होते.

मात्र काल एका ट्विटने त्यांचातील मित्राला हळवे केले. खरं तर धनंजय मुंडे ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याचदा व्यक्तही होत असतात.

उदगीर येथील अनंत पाटील व धनंजय मुंडे यांची ‘वर्गमित्र’ म्हणून जोडी फेमस होती.

धनंजय मुंडे यांना एकेरी बोलणारा ‘अनंत’त्यांचा ‘वर्गमित्र’ अनेक अडचणीत हमखास कामाला यायचा.

काल अनंत पाटील या ‘वर्ग मित्राचा’ मृत्यू झाल्यानं ते पुन्हा एकदा भावुक आणि मित्राच्या आठवणीत व्याकुळ झालेले पहायला मिळाले.

धनंजय मुंडेंनी ‘ट्विट’ करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय.

अनंता… मित्रा….सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकायला गेलो, तेव्हा पहिल्या लेक्चरला भेटलेला पहिला मित्र तू. तरुण वयात अनेक आठवणी मागे ठेवून अचानक आमच्यातून निघून गेलास. अनंता तुला विसरणं आणि हे दुःख पचवणं खरंच खूप कठीण आहे रे, असं ट्विट करत धनंजय मुंडे फारच भावुक झाले.

तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा…?, मी अनंत पाटील यांचे आई-वडील, पत्नी आणि सर्व कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. तरुण वयात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याचे दुःख पचवण्याची शक्ती त्यांना देवो, हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना. अँड अनंत पाटील यांस भावपूर्ण श्रद्धांजली. या कुटुंबाशी जवळीकता आणि बांधिलकी कायम राहील, असंही धनंजय मुंडेंनी अधोरेखित केलंय. धनंजय मुंडेंच्या या भावनिक प्रतिक्रियेची सगळीकडेच चर्चा आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here