पॉर्न व्हिडीओ पाहून सेक्स करताना तरुणाचा मृत्यू | तरुणीने केला ‘धक्कादायक’ खुलासा

243

नागपूर : नागपूरमध्ये पॉर्न व्हिडीओ बघून वेगवेगळ्या प्रकारच्या  पोझिशनमध्ये शारारिक संबंध ठेवत असताना गळफास लागून तरुणाचा मृत्यू झाला होता. 

या प्रकरणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तरुणीला अटक करण्यात आली होती. पण, आता तिला जामीन देण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर 8 जानेवारी रोजी ही घटना घडली होती.

त्यानंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्यानंतर अटक करण्यात आली होती.

  • आज नागपूर सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपी तरुणीला जामीन देण्यात आला आहे. तर आरोपी तरुणीने मृत तरुणासोबत 2019 मध्ये लपून लग्न केले होते, असा दावा तिने कोर्टात केला आहे, असे वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर होता. हा तरुण विवाहित होता. दोन वर्षांपासून त्याचे 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते.

याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना माहित होते. तो गुरुवारी दुपारी छोट्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे जाणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर त्याला तरुणीचा फोन आला होता.

त्यानंतर तो कामानिमित्ताने सावनेरला जात असल्याचे त्याने घरच्याना सांगितले होते. पण संध्याकाळ झाली तो परतला नाही. फोन केल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर रात्री 10 वाजता त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळाली, असेही त्याच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे तरुणीला अटक झाली होती, तिला आज कोर्टाने जामीन दिला आहे.

तरुणीचा खुलासा

तिच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोघांनी दहेगाव रंगारी येथे लॉजवर खोली भाड्याने घेतली. मोबाइलवर पॉर्न बघितला. त्यातील दृश्यांप्रमाणे संभोग करण्याच्या प्रयत्नात या तरुणाचा मृत्यू झाला.

मात्र, तरुणाच्या वडिलांनी ‘प्रेयसीनेच माझ्या मुलाचा गळा आवळून खून केला’, अशी तक्रार केली. खापरखेडा पोलिसांनी चौकशीअंती खुनाचा गुन्हा दाखल करीत तरुणीला अटक केली.

तिने Adv.अपूर्वा धवनकर आणि Adv. एस. टी. चव्हाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी तिची जामिनावर सुटका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here