औषधं घेताना तुमच्या 4 चुका जीवावर बेतू शकतात; दुर्लक्ष केले तर ‘हे’ परिणाम होतील!

428
Your 4 mistakes while taking the medicine can be fatal; Ignoring 'these' will have consequences!

आजच्या काळात छोट्याछोट्या दुखण्यासाठीही औषढे ( Medicine ) घेण्याची अनेकांना सवय असते. थोडा जरी आरोग्याबद्दल तक्रार जाणवली की औषधी घेण्याची सवय असते.

त्यामुळे दर दहा पंधरा दिवसांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने औषधी, गोळ्या घ्याव्या लागतात असे आपल्याच आसपास बरेच लोक सापडतील. वय कोणतेही असो औषधी आयुष्याचा भागच बनून गेली आहेत.

पण औषधं घेताना नजर चुकीने होणाऱ्या चुका (Mistakes while taking medicine) महागात पडू शकतात. सध्या कोरोना काळात तर सोशल मीडियावर उपाय व औषधी सांगणाऱ्या मेसेज व व्हिडीओनी धुमाकूळ घातला आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे टाळा

बऱ्याच वेळा एखादा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी ( Medications without a doctor’s Advice ) घेण्याची सवय असणाऱ्यांना भविष्यात त्याचा त्रास सहन करावा लागतो.

एखादं दुखंणं, आजार झाला की अनेक सल्ले देणारे भेटतात. कुणाच्या तरी सल्ल्याने पेनकिलर खाणं चुकीचे आहे. पेनकिलर आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? याची आहिती घ्यायला हवी.

एखादी पेनकिलर जरी तुमचे दुखणे कमी करत असेल तरी, तिचे वाईट परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे टाळले पाहिजे.

छोट्या-छोट्या कारणांसाठी औषधी घेणे

हल्ली कोणत्याही वयातल्या लोकांना छोटं दुखणंही सहन होत नाही. डोकेदुखी, मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, थकव्यामुळे झोप येत नसेल तर ताकद वाढवण्यासाठी तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये.

या प्रकारच्या गोळ्या किडनीच्या आजारांना आमंत्रण देतात. वेगवेगळ्या प्रकारची औषधी, पेनकिलर आपल्या किडनीवर वाईट परिणाम करतात.

एक्सापायरी डेट चेक करा

घरात काही औषधं पडून असतील तर त्यांची एक्सपायरी डेट चेक करावी. एक्सपायर झालेली औषधी खाल्ल्याने शरीरावर त्याची रिअॅक्शन होऊ शकते. मेडिकलमधून औषधं विकत घेतानाही औषधांवरील एक्सपायरी डेट चेक करावी, अशी औषधी घरात असतील तर ती फेकून द्यावीत.

इतरांची औषधी वापरू नयेत

एखाद्या आजारी व्यक्तीला डॉक्टरने दिलेली औषधं दुसऱ्या व्यक्तीने खाऊ नयेत. एखाद्या व्यक्तीला समस्या असल्यास, डॉक्टरांनी त्याच्यासाठी औषधं लिहून दिल्यास कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला अशीच समस्या असल्यास तेच औषधी दिली जाते.

जरी डॉक्टरांनी ही औषधं काही विशिष्ट समस्येसाठी लिहून दिली असली तरी, इतर कोणीही ती खाऊ नयेत. प्रत्येकाची योग्य प्रकारे तपासणी केल्यानंतरच डॉक्टर त्यांना औषधं लिहून देतात. म्हणूनच इतर कोणी सांगितलेली, सुचविलेली औषध खाणे टाळावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here